ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड येथे जागतिक कांदळवन संवर्धन दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड येथे जागतिक कांदळवन संवर्धन दिन साजरा.

प्रकाशन: 27 Jul 2022 07:09 PM
वाचन संख्या 28

शिरगांव | संतोष साळसकर :
26 जुलै हा जागतिक कांदळवन संवर्धन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने वन विभाग,कांदळवन कक्ष,मालवण आणि कांदळवन प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या सहकार्यातून तारामुंबरी येथील हनुमान मंदिर येथे जलकन्या बचत गट व कांदळवन सहव्यवस्थापन समिती, तारामुंबरी यांच्या पुढाकारातून एक नेचर ट्रेल म्हणजेच निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या नेचर ट्रेल मध्ये जिलहा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा,तारामुंबरी शाळेचे विदयार्थी व शिक्षक तसेच देवगड स.ह.केळकर कॉलेज नेचर क्लबचे विदयार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला.
यावेळी देवगड कॉलेजचे प्राध्यापक डॉ.नागेश दप्तरदार, डॉ. पारस जाधव,विजयकुमार कुन्नुरे,गुरुप्रसाद घाडी यांनी उपस्थित राहून सर्व विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच तारामुंबरी शाळेचे मुख्याध्यापक संदिप परब, उपमुख्याध्यापिका सुखदा गोगटे,श्रीदेवी स्वामी तसेच देवगड केंद्रप्रमुख स्नेहा पारकर,गटसाधन केंद्र देवगडचे विषय तज्ञ आवडणकर,आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी शाळेतील विदयार्थ्यांकडून कांदळवनाच्या नऊ प्रजातींची चित्रीरुपाने माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर डॉ.नागेश दप्तरदार व डॉ.पारस जाधव यांनी कांदळवन व नेचर ट्रेल दरम्यान आढळलेल्या सर्व प्रजातींची ओळख व त्यांचे उपयोग तसेच महत्व सर्वांना पटवून दिले तसेच प्रजाती कश्या ओळखायच्या या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शाळेच्या विदयार्थ्यांना गोष्टींची पुस्तके, पेन्सिल पटटी,रबर सेट तर कॉलेजच्या सर्व विदयार्थ्यांना पेन सेट व उपस्थित सर्व मंडळींना बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जलकन्या बचतगट व कांदळवन सहव्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण तारी, भैरवनाथ बचत गट प्रमुख प्रियांका तारी, प्रियांका खवळे,उधाण बचतगट प्रमुख मयुरेश तारी व त्यांचे सदस्य आणि प्रकल्प समन्वयक मृणाल डांगे, श्रृती घाग,राज तेली,केशर चोपडेकर यांनी विशेष् मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स