ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>मडूरे स्टेशनवर विशेष गाड्यांना थांबा द्या ;अन्यथा स्वातंत्रदिनी उपोषण.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>मडूरे स्टेशनवर विशेष गाड्यांना थांबा द्या ;अन्यथा स्वातंत्रदिनी उपोषण.</em>

प्रकाशन: 27 Jul 2022 06:13 PM
वाचन संख्या 29

मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा…!

बांदा | राकेश परब :
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना मडुरे स्थानकावर थांबा मिळावा या आशयाच्या मागणीचे निवेदन दशक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे कोरेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले. मडुरे स्टेशन मास्तर कृष्णकांत परब यांच्याकडे सदर निवेदन जगन्नाथ पंडीत यांनी सुपूर्द केले. गाड्यांना थांबा न दिल्यास स्वातंत्रदिनी स्टेशन आवारात दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सवात कोकण रेल्वेतून हजारो चाकरमानी गावाकडे येतात. त्यासाठी कोरे प्रशासनाने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या गाड्यांना मडूरे स्थानकात थांबा दिलेला नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना सावंतवाडी स्टेशनवर उतरावे लागते.
सावंतवाडीतून गावात येण्यासाठी ८०० ते हजार रुपये भाडे देऊन रिक्षा किंवा चारचाकी वाहन करुन येणे भाग पडते. त्यामुळे नाहक प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागते. मडूरे स्टेशनवर विशेष गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय १३ ऑगस्ट पर्यंत न झाल्यास स्वातंत्रदिनी स्टेशन आवारात उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सातोसेचे जगन्नाथ पंडीत, माजी सरपंच प्रकाश गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, रोणापाल उपसरपंच भिकाजी केणी, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, अरुण परब, घनश्याम चौकेकर, रुजाय फर्नांडिस, पेद्रु डिसोझा, विद्या धारगळकर, मोहन गवस, सदानंद गावडे, मंदार गावडे, बाबल तुयेकर, सचिन कुबल, सुनील मडुरकर, दीपक कोचरेकर, संतोष सावळ, रुजिनाल रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स