"फ्रिडम" फिल्म ठरेल सुपरहीट फिल्म : मुख्याध्यापक नंदन घोगळे.
शिरगांव | संतोष साळसकर : आगामी लघुपट “फ्रिडम”चे प्रमोशन व रिलीज शेठ म.ग.हायस्कूल देवगड चे मुख्याध्यापक संजीव राऊत सर यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये संपन्न झाला.
आर्टीक प्रोडक्शन अँड टीम आणि पावणाई देवी कलामंच तळवडे , बागतळवडे , तळेबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फ्रिडम चे प्रमोशन व रिलीज मुख्याध्यापक संजीव राऊत सर यांच्या प्रमुख उपस्थित श्री भवानी मंगल कार्यालय चांदोशी येथे संपन्न झाले.
यावेळी व्यासपिठावर महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार चे मुख्याध्यापक नंदन घोगळे सर , शॉर्ट फिल्म फ्रिडमचे प्रोड्युसर दशरथ चव्हाण , सिनेमा ऑटोग्रॉफी डिओपी अँड फिल्म एडीटर कु. मृणाल चव्हाण, प्राथमिक शाळा शिक्षक मिराशी सर , माजी सरपंच श्वेता शिवलकर , समाजसेवक तसेच कलाकार दत्तप्रसाद जोईल , पत्रकार विनायक धुरी , नागेश दुखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
“फ्रिडम” पिक्चर सुपर हिट ठरेल असे प्रतिपादन नंदन घोगळे यांनी अध्यक्षीय भाषणावेळी आपले मत मांडले. ग्रामीण भागातील हा सिनेमा महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही धुमाकुळ घालेल असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रोड्युसर दशरथ चव्हाण यांनी लेखक श्रीपाद बाणे तसेच सर्व कलाकारांचे कौतुक करत त्यांची मेहनत निश्चितच समाजात परीर्वतन घडवेल असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख मान्यवर संजीव राऊत सर म्हणाले की, शॉट फिल्म “फ्रिडम” सिनेमा भविष्यात बीग फिल्म म्हणून नावारूपाला येईल तसेच समाजात वेगळा आदर्श घालुन देईल. तसेच हा सिनेमा इतिहास घडवेल असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बाल कलाकरांचेही त्यांनी विशेष अभिनंदन करत हे कलाकार भावी मोठे कलाकार होतील असे ते म्हणाले.
यावेळी शॉर्ट फिम्लचे प्रोड्युसर तसेच आबांची बाय सगळ्याची घाय या नाटीकेचे दिग्दर्शक व यशस्वी लेखक दशरथ चव्हाण यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. त्यांनी लेखन केलेली ही नाटीका विधवा महिलेच्या जीवनावर आधारीत असुन या नाटकाचा कोणताही भाग किंवा शब्द न वगळता रंगभुमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने त्यांना कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र दिले आहे . या यशाबद्दल तळवडे तळेबाजार,बागतळवडे ग्रामस्थांनी दशरथ चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी दशरथ चव्हाण म्हणाले कि,आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच आपण काहीतरी देण लागतो याच उद्देशाने आपले काम करत असतानाच समाजासाठी काहीतरी करावे या एकाच उद्देशाने या क्षेत्रात आपण समाजप्रबोधनाचे काम केले आणि त्यांचाच भाग म्हणून “आबांची बाय आणि सगळ्यांची घाय” या नाटीकेला सर्वत्र स्तरातुन कौतुक झाल आणि शासनानेही पाठीवर शाबासकीची थाप मारत मला उत्कृष्ट लेखनाबाबतीत प्रमाणपत्र दिल हा माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण आहे असे मी मानतो. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे , जिल्हा पोलीस उपअधिक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे , देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच जिल्हा पोलीस प्रशासनातील व देवगड पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पांडुरंग अनभवने, स्थानिक कलाकार व ग्रामस्थांनमुळेच आणि आपण केलेल्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त झाले असुन आज जो शॉर्ट फिल्म “फ्रिडम” सिनेमाही आपल्या सर्वांच्या नक्कीच पसंतीला येईल असे त्यांनी प्रतिपादन केले.
या शॉर्ट फिल्म फ्रिडमचे प्रोड्युसर दशरथ चव्हाण , लेखक श्रीपाद बाणे , दिग्दर्शक दिव्यांनी दशरथ चव्हाण , असिस्टंट दिग्दर्शक सायली शिवलकर , चैत्राली काणेकर, फिल्म एडीटर कु.मृणाल चव्हाण, टेक्नीकल टीम अभिरूदध नारींग्रेकर , सुजित सामंत , म्युजिक कंपोजर श्रीधर पाचंगे अँड सप्तक टीम कणकवली , कास्टींग श्रीपाद बाणे , सायली शिवलकर , दशरथ चव्हाण , अनिता चव्हाण , कृतिका भाकरे , दिव्यांनी चव्हाण सिद्धी यादव, ऋत्विक धुरी , ओमकार गांवकर, स्वप्निल रुमडे, गौरव साटम , राहुल अनभवणे , यामिनी बाक्रे , गीतेश वळंजु , गणेश लब्दे, दत्तप्रसाद जोईल , स्वप्नाली भट , अनुष्का वळंजु , श्रुतिका शिवलकर , रत्ना वारंग , सचिन धुरी , छोटे कलाकार दुर्वा वारंग , वेद गांवकर आदी कलाकारांचा सामावेश आहे . या शॉर्ट फिल्म साठी श्री गणेश उत्साही मंडळ तळेबाजार अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार ,संदिपशेठ तेली,विनायकशेठ पारकर,मंदा साटम,पाटील वडापाव सेंटर, तळेबाजार यांचेही आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद दुखंडे , तर आभार दशरथ चव्हाण यांनी मानले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)