ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कृषी विषयक उपक्रमांसाठी ३५ लाखांचे कर्ज बँक ऑफ इंडिया कडून वितरित : मुकेश मेश्राम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कृषी विषयक उपक्रमांसाठी ३५ लाखांचे कर्ज बँक ऑफ इंडिया कडून वितरित : मुकेश मेश्राम.

प्रकाशन: 25 Jul 2022 01:13 PM
वाचन संख्या 42

बांदा | राकेश परब :
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांसाठी बँक ऑफ इंडियाने नेहमीच मदतीचा हात दिला असून बँकेच्या बांदा शाखेच्या वतीने आतापर्यंत कृषी विषयक उपक्रमांसाठी ३५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना उपलब्ध असून बँक आर्थिक सहाय्य देण्यासाठी तत्पर आहे. या योजनांचा लाभ घेऊन शेतीतून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन बँकेचे अग्रणी जिल्हा मॅनेजर मुकेश मेश्राम यांनी येथे केले.


येथील ग्रामपंचायत सभागृहात बँक ऑफ इंडियाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री मेश्राम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बांदा सरपंच अक्रम खान, बँकेचे बांदा शाखा व्यवस्थापक अंकित धवन, कर्ज अधिकारी सागर कटावते, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये, तलाठी वर्षा नाडकर्णी, कृषी मंडळ अधिकारी प्रकाश घाडगे, कृषी पर्यवेक्षक अजमुद्दीन सरगुरू, तालुका प्रकल्प अधिकारी प्रताप सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, शामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, उमंगी मयेकर तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री मेश्राम यांनी यावेळी शेतकऱ्यांना कृषी कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच किसान क्रेडिट कार्ड, तात्काळ कर्ज, किसान वाहन, एसएचजी यासंदर्भात माहिती दिली. शासनाच्या कृषी विषयक अनेक योजना असून या योजना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी बँक पतपुरवठा करण्यासाठी केव्हाही तयार असून कागदपत्रांची पूर्तता करून बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे म्हणाले कि, आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी ३१ जुलै पूर्वी ऑनलाईन ई पीक नोंदणी करावी. ई पीक नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकतो. जमिनीत सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी अनेक योजना असून यासाठी शासकीय अनुदान देखील आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे अधिकाऱ्यांनी निराकारण केले. यावेळी बँकेच्या बांदा शाखेतून कर्ज मंजूर झालेल्या १० लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे व धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स