मुख्याध्यापक श्री लक्ष्मण पावसकर यांचा गुणवंत मुख्याध्यापक म्हणून सत्कार.
बांदा | राकेश परब :
स्वरताल संगीत विद्यालय दोडामार्ग व श्री राष्टोळी कला, क्रीडा व ग्रामविकास मंडळ, घाटवाडी कसई दोडा मार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२२ या कार्यक्रमात खेमराज मेमोरील इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा तालुका सावंतवाडी या प्रशालाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री लक्ष्मण पावसकर यांचा गुणवंत मुख्याध्यापक म्हणून मंडळाकडून प्राध्यापक मा. भारत बागकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना निवुत्त मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण पावसकर यांनी आपण प्रामाणिकपणे व स्वतःचे काम म्हणून आपले कामकाज पूर्ण केलेले आहे. आपले आनंदी जीवन जगत असताना प्रत्येक प्रशासकीय बाबींमध्ये अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन चांगल्या प्रकारे कामकाज केलेले आहे असे ठामपणे सांगितले तसेच अनेक नवीन उपक्रम अंमलात आणण्यात आले. निवृत्तीनंतर दोडामार्ग तालुक्यातील मंडळाने सत्कार केला तसेच गुणवंत विद्यार्थी , शिक्षक, समजातील अन्य गुणवंत व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल या मंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून पुढील वाटचालीस मंडळास शुभेच्छा देण्यात आल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)