ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वीज वितरण विभागाला सुरेश गावडे यांनी धारेवर धरले.

वीज वितरण विभागाला सुरेश गावडे यांनी धारेवर धरले.

प्रकाशन: 25 Jul 2022 01:09 PM
वाचन संख्या 43

बांदा | राकेश परब :
पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार उद्भवणारी वीज समस्या अजूनही कायमच आहे. लेखी निवेदने, उपोषण, घेराव घालूनही वीज वितरण विभागाला जाग येत नसल्याने ग्राहक हतबल झाले असून वीज समस्या कधी मार्गी लावणार असे सांगत रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी महावितरणच्या कामावर अधिकाऱ्यांसमोरच ताशेरे ओढले. सर्व समस्या ऐकल्यानंतर गणेशोत्सवा अगोदर मडुरा पंचक्रोशीसह आरोस परिसरातील वीज समस्या कायमची मार्गी लावणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री.विपर यांनी सरपंच सुरेश गावडे यांना दिले.
रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत अधीक्षक अभियंता श्री. विपर बोलत होते. यावेळी अतिरिक्त अभियंता श्री. मिसाळ, उपअभियंता श्री.भुरे, शाखा अभियंता श्री. यादव, लाईन स्टाफ श्री. सपकाळे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब उपस्थित होते.
दांडेली मार्गे डोंगरातून मळेवाड सब स्टेशन येथे जाणारी लाईन अद्ययावत करणे, सातार्डा लाईन अद्ययावत करणे, आरोस फीडरवरून जाणाऱ्या सर्व लाईनवरील झाडे तोडून सफाई करणे, फीडरवरील सर्व गावांतील एलटी लाईनवर आलेली झाडे तोडून अद्ययावत करणे, कामगार वाढविणे तसेच प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री विपर यांनी दिले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने वीज अधिकाऱ्यांच्या आश्वासनांवर निर्भर न राहाता नेमक्या समस्या कधी मार्गी लावणार असा सवाल सुरेश गावडे यांनी केला.
गतवर्षी वीज वारंवार खंडित होत असल्याने सर्वात मोठा फटका गणेश मूर्तीकारांना बसला. तसेच ऐन गणेशोत्सवातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता त्यामुळे गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती यावर्षी करू नये असे निर्देश श्री.गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तर गणपती चित्र शाळांना विजेची समस्या उद्भवणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत तसेच पाणी पुरविणाऱ्या नळयोजना विजेअभावी जास्त वेळ बंद राहणार नाहीत यासाठी सरपंचांना समाविष्ट करून एक ग्रुप तयार करून त्याद्वारे माहिती पुरवण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक व वैयक्तिक थांबलेली कामे तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्री. विपर यांनी सुरेश गावडे यांना दिले.
दरम्यान, दिलेले आश्वासन गणेशोत्सवा अगोदर पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असून याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर राहील असे सरपंच गावडे यांनी बोलताना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स