ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे केंद्र शाळा येथील आदर्श शिक्षक विनोद कदम यांना पितृशोक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे केंद्र शाळा येथील आदर्श शिक्षक विनोद कदम यांना पितृशोक.

प्रकाशन: 24 Jul 2022 06:55 PM
वाचन संख्या 75

मसुरे | प्रतिनिधी :

देवगड तालुक्यातील किंजवडे कदम वाडी येथील रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबा कदम 82 वर्ष यांचे शनिवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता किंजवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रामचंद्र कदम यांच्या निधनाने किंजवडे गावावरती शोककळा पसरली आहे.

रामचंद्र यांचे किंजवडे परिसरात सामाजिक कला क्रीडा साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी आदर्श असे काम केले होते. ठाणे बेलापूर येथील बास ऑफ इंडिया या कंपनीतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. गावामध्ये सर्वांशी त्यांचे आदराचे आणि प्रेमाचे वागणे होते. लहान थोर अबाल वृद्धांमध्ये ते लोकप्रिय होते. अनेक गरजूंना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी वेळोवेळी मदत केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी ,सुना, जावई नातवंडे, पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे.
नगर भूमापन अधिकारी बोरीवली कार्यालय येथील अधिकारी प्रमोद कदम, अर्बन बँक कासार्डे चे कर्मचारी जयदीप कदम, मसुरे केंद्र शाळा येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक विनोद कदम, फिशरमॅन सोसायटी देवगड चे सहसचिव उमेश कदम, प्राध्यापिका व साहित्यिका कुडाळ येथील आदर्श शिक्षिका अनुष्का अविनाश रेवंडकर यांचे ते वडील आणि कुडाळ कनिष्ठ अभियंता अविनाश रेवडकर यांचे ते सासरे होतं.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स