आपली सिंधू नगरी न्यूज चॅनेल चे संपादकीय सहाय्यक विवेक उर्फ राजू परब यांचा त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीच्या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट कडून "कृतज्ञता पत्र" ने सन्मानित .
शिरगांव / संतोष साळसकर :
रत्नागिरी येथील “बोडस चॅरिटेबल ट्रस्ट” ही गेली १० वर्षे क्रियाशील ट्रस्ट म्हणून ओळखली जाते.या ट्रस्टच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अप्रकाशित व्यक्ती,संस्था यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते.नुकताच ११ जुलैला “आपली सिंधू नगरी न्यूज” चॅनेल चे संपादकीय सहाय्यक (एडिटोरियल असिस्टंट) विवेक उर्फ राजू परब यांना या ट्रस्ट ने त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानत त्यांना “कृतज्ञता पत्र” बहाल करून त्यांचे खास अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर येथील एक उमदे तरुण व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विवेक उर्फ राजू परब हे आपली सिंधू नगरी या न्यूज चॅनल चे संपादकीय सहायक काम करीत आहेत. त्यांच्या आजवरच्या विविध वाचनीय बातम्या,विशेष लेख, फोटो फीचर,विशेष पुरवण्या, विशेषांक,आणि अन्य प्रकाशने ,वृत्तांकन याचा या ट्रस्ट ला संदर्भ म्हणून खूप उपयोग झाला.या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट ने केलेल्या सत्काराचा, कार्यक्रमांच्या, विविध उपक्रमांच्या मदतीच्या वृत्ताना पत्रकार विवेक परब यांनी वेळोवेळी आणि योग्यवेळी प्रसिध्दी देऊन सहकार्य दिले.त्याबद्दल ट्रस्ट चे यांनी त्यांचे विशेष आभार मानत त्यांना लेखी “कृतज्ञता पत्र” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात विवेक परब यांना एका मान्यवर ट्रस्टकडून मिळालेले हे “विशेष कृतज्ञता पत्र” म्हणजे मला माझ्या आयुष्यात पहिला खास पुरस्कार मिळाला असे मी समजतो असे विवेक परब म्हणाले. ते म्हणतात की, मी लिहिलेला “दिवा बत्ती कारागीर सुरेश तोडकर” यांच्यावरील लघुलेखामुळे या ट्रस्टशी माझा संबध आला. हा लेख चिंदर फेसबुक पेजवर शेअर झाला तसेच अनेक स्थानिक वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाला. यामुळे या कारागीराच्या मदतीसाठी व सदर कला जोपासण्यासाठी अनेक संस्था, संघटना तसेच लोकांनी संपर्क साधला. अनेकांनी तोडकरकाकांना वैयक्तिक मदत करण्याची तयारी दाखवली. त्यात रत्नागिरी येथील बोडस चँरिटेबल ट्रस्टनेही स्वतःहून वैयक्तिक संपर्क साधला व तोडकर यांना ‘रोख रक्कम रुपये तीन हजार शंभर व सन्मानपत्र’ असा कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला.बोडस चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक उदय बोडससर सतत माझ्या संपर्कात राहिले. तसे पाहता बोडससरांशी माझी अद्याप भेट झालेली नाही. पण या निमित्ताने मनाने मात्र आम्ही कायमचेच जोडले गेलो. बोडससर ‘गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी’ येथे वाणिज्य शाखेत अकाउंटसी, काँस्टिग मँनेजमेट, मार्केटिंग आणि ट्रँव्हल अँण्ड टुरिझम या विषयांचे प्राध्यापक होते. सरांनी ६ वर्षे उपप्राचार्य पदाची जबाबदारी ही पार पाडली आहे. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दीन-दलितांच्या तळागाळा पर्यंत पोचण्याचा बोडस ट्रस्ट प्रयत्न करत आहेत. बोडस चँरिटेबल ट्रस्टने यंदा १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील वाटचालीत ट्रस्टने अनेक समाजाभिमुख कामे केलेली आहेत. विशेष म्हणजे स्वतःची कार्य पध्दती वापरुन ट्रस्ट कोणतेही अर्ज, फाईल वा शिफारस न घेता हे कार्य करत आहे. तोडकरकाकां वरील लेखाबाबत ट्रस्टने मला कृतज्ञता पत्र देऊन माझा सन्मान केला आहे.आभार मानले आहेत. यामध्ये “चिंदर फेसबुक पेज, आपली सिंधुनगरी न्यूज चँनल, अनेक स्थानिक वृत्तपत्रे, पत्रकार मित्र, साहित्यिक मित्र” यांची मला मोलाची मदत,साथ मिळाली होती.’बोडस चँरिटेबल ट्रस्ट, रत्नागिरी चे अध्यक्ष प्राध्यापक उदय बोडस, उपाध्यक्ष डॉ. सौ. सुमेधा करमरकर, सचिव संतोष देसाई, खजिनदार सौ. आदिती पटवर्धन, यशराज बोडस आणि इतर ट्रस्टी यांचे मनापासून आभार विवेक परब यांनी मानले.या ट्रस्टने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशा सदिच्छाही दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)