ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>मसुरे येथील मिहीर शैलेश मसुरकर या सात वर्षाच्या बालकाचा प्रामाणिकपणा..</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>मसुरे येथील मिहीर शैलेश मसुरकर या सात वर्षाच्या बालकाचा प्रामाणिकपणा..</em>

प्रकाशन: 24 Jul 2022 09:29 PM
वाचन संख्या 249

रस्त्यात मिळालेले पैसे प्रामाणिकपणे केले परत…

मसुरे | प्रतिनिधी :
सर्वत्र माणुसकी आज लुप्त होत आहे. सर्वत्र पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मात्र मसुरे बाजारपेठ येथील सात वर्षाच्या एका बालकाने मात्र प्रामाणिक पणाचे एक मूर्तीमंत उदाहरण आज सर्वांसमोर ठेवले आहे. या छोट्या बालकाचे नाव मिहीर शैलेश मसुरकर असून मसुरे केंद्र शाळा येथे इयत्ता दुसरी मध्ये तो शिकत आहे.त्याला रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये त्याने परत करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
रविवारी संध्याकाळी मसुरे मर्डे बाजारपेठ येथे आपल्या मोठ्या बहिणी कडे जात असताना रस्त्यामध्ये पडलेले बाराशे रुपये त्याला मिळाले. प्रामाणिकपणे ते सर्व पैसे तेथीलच नाचणकर काकांकडे देऊन त्यांना रस्त्यावर पडलेले हे पैसे मला मिळाले असून ज्याचे असतील त्यांना तुम्ही परत द्या असे या बालकाने सांगितले. यानंतर नाचणकर काकांनी या पडलेल्या पैशाचा शोध घेता येतीलच राहुल शिवाजी परब या युवकाला त्याचे पैसे पुन्हा परत दिले. मिहीर हा मसुरे केंद्र शाळा येथे शिकत असून प्रशालेतच त्याला त्याच्या शिक्षकांकडून आणि आई-वडिलांकडून प्रामाणिक पणाचे धडे मिळाले होते. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीस स्वरूपात देऊ केलेली रक्कम सुद्धा त्याने मोठ्या मनाने नाकारली.
मिहीर मसुरकर याच्या प्रामाणिक पणाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स