<em>पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान आवश्यक : श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थानचे सेक्रेटरी विनायक राऊत यांचे प्रतिपादन.</em>
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ आणि महाराष्ट्र तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने तळेबाजार येथे करिअर मंत्रा हा मुलांच्या करिअर विषयी संवाद व गुणगौरव कार्यक्रम .
शिरगांव/संतोष साळसकर :
मुलांमधे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.सर्वच मुलांमधे बुध्यांक हा उपजत असतो.पण त्याची वाढ व्हायला पाहिजे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर जागतिक, व्यवहारिक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यासाठी पालकांनी सजग रहायला पाहिजे.आपल्या समाजाचा, संतांचा इतिहास त्यांना माहीत असला पाहिजे.तरच ही पिढी संस्कारक्षम बनेल. असे प्रतिपादन रत्नागिरी येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थानचे सेक्रेटरी विनायक राऊत यांनी बोलताना व्यक्त केले.
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ देवगड आणि महाराष्ट्र तैलिक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयात करिअर मंत्रा २०२२ हा १० वी/ १२ वी , पदवीधर विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी करिअर विषयी संवाद व गुणगौरव कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरगांव येथील राजेंद्र साटम हे होते.या कार्यक्रमाची सुरवात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी “नमन अमुचे तुम्हाला जगनाडे महाराज…. ” हे तुकाराम तेली यांनी स्वरचित केलेल्या गीतगायनाने या कार्यक्रमाला बहार आली.
यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी येथील श्री देव गणपतीपुळे देवस्थान चे सेक्रेटरी तथा बळीराम पारकर विद्यालय व मयेकर ज्युनिअर कॉलेज चे माजी मुख्याध्यापक विनायक राऊत, युनिक अकॅडमी कणकवली शाखेचे व्यवस्थापक सचिन कार्लेकर,जामसंडे – देवगड नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली, सचिव विजय शेट्ये, खजिनदार नारायण हिंदळेकर, जिल्हा कार्यकारणी चे उपाध्यक्ष तुकाराम तेली,शिरगाव हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक राजेंद्र साटम, चंद्रशेखर तेली, जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. शुभांगी तेली, पुंडलिक शेट्ये, मधुकर कुवळेकर, महेश मोंडकर,अविनाश शेट्ये, गढीताम्हाणे चे माजी सरपंच शुभाष शेट्ये,उमेश गवाणकर,रविकांत चांदोस्कर,सचिन हिंदळेकर, प्रदीप वाडेकर, चाफेड चे माजी सरपंच संतोष साळसकर,सुनिता शेट्ये आदींसह तेली ज्ञाती बांधव,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युनिक अकॅडमी कणकवली शाखेचे शाखाव्यवस्थपक सचिन कार्लेकर म्हणाले की, आजच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दरवर्षी कोकणातील मुले १० वी/ १२ वी मध्ये अव्वल नंबर ने पास होतात. पण किती मुले स्पर्धा परीक्षेत येतात हा खरा प्रश्न आहे. आजच्या युगात स्पर्धा परीक्षेची खरी गरज आहे. ५ वी ते १२ वी पर्यंत तोच अभ्यासक्रम असतो मात्र त्याची उजळणी झाल्यास आजची मुले स्पर्धा परीक्षेत टिकाव धरतील. एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. अशा स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत.त्यासाठी पाल्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिला पाहिजे. मोबाईल हे केवळ साधन आहे. त्याचा चांगल्यासाठीच वापर झाला पाहिजे. असे त्यांनी मार्गदर्शन केले.
जामसंडे – देवगडच्या नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर म्हणाल्या की,कुटुंबामध्ये कमुनिकेशन असायला पाहिजे. आजच्या मुलांनी शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद केले पाहिजे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकरी बनण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे.त्याच बरोबर समाजात चांगला माणूस बना,चांगले धेय्य उराशी बाळगा.मुलांच्या शिक्षणाकडे आईने जास्त लक्ष दिले पाहिजे.असे सांगितले.माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर म्हणाले की,मी या तेली समाजाचा घटक आहे याचा मला खरच खूप अभिमान आहे.त्यामुळे माझ्या समाजातील मुलांना उद्योग धंद्यासाठी काही शासकीय, केंद्रस्तरीय मदत लागल्यास मी नक्कीच सहकार्य करीन. असे सांगितले.तर शिरगाव हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक राजेंद्र साटम म्हणाले की मुलांना लहानपणापासून स्कॉलरशिप परीक्षेला बसवा. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सतत काहीना काही शिकत रहा. असे सांगितले.जिल्हा कार्यकारणी चे उपाध्यक्ष तुकाराम तेली म्हणाले की, मुलांनो तुम्ही स्वतःला कधी कमी लेखू नका. अत.विश्वासाने टाकलेले प्रतेक पाऊल हे नक्कीच यशस्वी होईल.एकमेकांना मदत करा,सहकार्य करा.त्यातूनच आपल्या समाजाचा विकास होईल.असे सांगत माझी मुलगी सोनाली हिने रशियात वैद्यकीय शिक्षण घेतले. पण त्यानंतर तिने आपल्याच मायभूमीत देवगड ला कोरोना काळात लोकांची चांगली सेवा केली. याचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. नैतिक मूल्यांच्या आधारे आपण आपले जीवन समृध्द करू शकतो.असे सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली यांनी पुढच्या वर्षी १० वी,१२ वी मध्ये तालुक्यात प्रथम येणाऱ्या मुलास रोख ५०००/- द्वितीय मुलास रोख ३०००/-, तृतीय मुलास रोख २०००/-, आणि प्रोत्साहन पर १०००/- तर शिरगाव येथील पुंडलिक शेट्ये यांनी १० वी . मध्ये तालुक्यात येणाऱ्या प्रथम मुलास रोख ५०००/- अशी बक्षिसे जाहीर केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते १० वी, १२ वी च्या गुणवंत मुलांचा गुणगौरव करण्यात आला. तर मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर तेली यांनी तर आभारप्रदर्शन तुकाराम तेली यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)