ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची कासार्डे येथे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची कासार्डे येथे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न..!

प्रकाशन: 18 Jul 2022 12:55 PM
वाचन संख्या 101

बैठकीत संघटनात्मक बांधणी आघाडीचे काम कसे करायचे या संदर्भात चर्चा करत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी रवींद्र विश्वास चव्हाण, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा संघटक पदी वसंत लक्ष्मण चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली .

कासार्डे | प्रतिनिधी : दिनांक 17 जुलै 2022 रोजी कासार्डे येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक संपन्न झाली. ही बैठक भारतीय जनता पार्टी भटके मुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषद शक्ति केंद्रप्रमुख गणेश पाताडे, तळेरे गावचे बूथ अध्यक्ष रोहित महाडिक, वसंत चव्हाण दादाराव चव्हाण लक्ष्मण गोसावी अमित गोसावी विश्वास चव्हाण मयूर चव्हाण रवींद्र चव्हाण राजू शिंदे सुरेश पवार शिवाजी गोसावी गुलाब गोसावी बाबासाहेब गोसावी व इतर भटके विमुक्त आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तालुका निहाय भेटीघाटी घेऊन संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकरिता आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत याच पार्श्वभूमी वरती नुकतीच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्षपदी नियुक्त झालेले किरण चव्हाण यांच्या सहकार्यातून कासार्डे येथील माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत नवलराज काळे व किरण चव्हाण यांनी मार्गदर्शन करून समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी या पदांचा वापर करून समाजाला न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र येऊन करू असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी मी एकट्याने शंभर जणांच्या पुढे शंभर पावलं जाण्यापेक्षा 100 जणांना घेऊन एक पाऊल पुढे जाने कधीही चांगले. त्यामुळे आम्ही किती पुढे गेलो तरी समाजाला घेऊनच आमच्या सोबत थोडे जाऊ आपण सर्वांनी बरोबर आणि काम करूया. त्याचबरोबर किरण चव्हाण यांनी देखील माझ्या पदाचा वापर माझ्या समाजाला उन्नती नेण्या करिता जेवढे काही करता येईल तेवढं करू असे आश्वासन दिले. उपस्थित समाज बांधवांनी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचे कासार्डे नगरीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नुकतेच नवनियुक्त झालेले सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण रघुनाथ चव्हाण यांचा सर्व समाज बांधवांनी जाहीर सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कासार्डे ग्रामपंचायतचे सदस्य पाताडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा बैठकीत दिला यापुढेही यांची कामे आमच्याच माध्यमातून होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थित समाज बांधवांनी देखील केलेल्या कामांचा आढावा देत पातडे यांचे आभार मानले. सदर बैठकी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी रवींद्र विश्वास चव्हाण, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा संघटक पदी वसंत लक्ष्मण चव्हाण यांची निवड करण्यात आली. या दोघांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स