ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भल्ली भल्ली भावय….च्या जल्लोषात… ढोल ताशांच्या गजरात साळशी येथे भावई उत्सव उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भल्ली भल्ली भावय….च्या जल्लोषात… ढोल ताशांच्या गजरात साळशी येथे भावई उत्सव उत्साहात साजरा.

प्रकाशन: 17 Jul 2022 05:21 PM
वाचन संख्या 119

शिरगांव/संतोष साळसकर :
ढोल ताशाच्या गजरात… एकमेकांवर चिखल फेक करीत.. भल्ली भल्ली भावय म्हणत …. जल्लोषमय आणि भक्तिमय वातावरणात शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव देवगड तालुक्यातील साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. श्री सिद्धेश्वर देवालयासमोर भावई देवी असून तिचा उत्सव असतो.


या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाच्या सुरवात करून श्री पावणाई दवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावईच्या जल्लोषात भावई खेळली जाते. यामध्ये लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. यावेळी एकमेकास चिखल लावला जातो. तसेच होळदेव (मोठा दगड) दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. त्यानंतर जमिनीत चिखलात पुरण्यात आलेला नारळ हस्त कौशल्याने काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात त्या “सापड खेळणे” असे म्हणतात. त्यांचा सर्वजण ८४ चाळ्यावर जाऊन नवस बोलणे नवस फेडने आदी कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा सर्वजण श्री पाव्णाई देवालया समोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो. त्यानंतर शिवकळा (तरंग – अवसर ) काढण्याची कला सादर करतात. या शिवकाळे कडे शिकार मानवून शिकारीचे मुडके प्रतिकात्मक अभ्यासात टाळ ढोल ताशाच्या गजरात मिराशी कुटूबियांकडे नेला जातो तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्यावार्षिक उत्सवाला सुरुवात होते या दिवशीच्या आदल्या दिवशी सायंकाळी “देसरुड” काढण्यात येते. सध्या शेती हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा हा भावई उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स