ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>बिघाड झालेल्या टेम्पोला कंटेनरची जोरदार धडक; एडगाव येथील घटना…</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>बिघाड झालेल्या टेम्पोला कंटेनरची जोरदार धडक; एडगाव येथील घटना…</em>

प्रकाशन: 17 Jul 2022 08:03 PM
वाचन संख्या 38

वैभववाडी | नवलराज काळे :
एडगाव येथे बंद पडलेल्या टेम्पोला कंटेनरची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात टेम्पो मध्ये झोपलेला चालक हा बालबाल बचावला आहे. दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात घडला.
एडगाव घाडीवाडी नजीक दोन दिवसापूर्वी टेम्पो (नं. एम एच 17-बीवाय 8913) ला बिघाड झाल्याने बंद पडला होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला तो टेम्पो उभा करण्यात आला होता. आज सकाळी कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा (नं.एमएच 04- जेयु -6929) ब्रेक फेल झाला. व कंटेनर उभ्या असलेल्या टेम्पोला धडकला. या अपघातात दोन्ही वाहनांचे दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर चालक बालबाल बचावला आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ व वाहन चालकांनी गर्दी केली होती.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स