ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>आरोपी गजाआड…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>आरोपी गजाआड…!</em>

प्रकाशन: 17 Jul 2022 04:14 PM
वाचन संख्या 60

कुडाळ | प्रतिनिधी :
तेजस मोतीराम नेवगी यांचे कुलूपबंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील कपाटामधील 2,88,500/- (दोन लाख अठ्याएंशी हजार पाचशे रुपये किमतीचे दागीने भांडी तसेच रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेले तसेच मालवण शहरातील साक्षीदार महेश रामचंद परब रा. राममंदीर नजीक मेडा मालवण यांचे राहते घराचा कुलूपबंद मुख्य दरवाजा फोडून आतील रोख रक्कम 2500/- नेली त्याच प्रमाणे साक्षीदार ऋतुजा रविंद्र वारीसे यांचे कुलूपबंद घराचा कडा तोडून परत प्रवेश करून कपाट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून गुन्हा नोंद आहे.
गुन्हयाचे तपासात मालवण शहरात लावण्यात आलेले कॅमेरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले त्यात एक अज्ञात इसम पाठीवरती सँग लावून संशयास्पद चालत असताना दिसताना दिसला त्याच दरम्यान एक सफेद रंगाची कार शहरात फिरत असतानाची दिसली म्हणून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता सदर कार चा नंबर MH 13-02-1109 असा असल्याबाबत खातरजमा झाली. सदर वाहनाबाबत माहिती प्राप्त करून घेतली कागदपत्रात मिळून आलेला मोबाईल क्रमांकाचे सीडीआर एसडीआर प्राप्त करून त्याचा प्राप्त डाटाशी सांगड घालून वाहन मालक व आरोपीत वापरत्या क्रमांकाची माहीती प्राप्त करून त्या अनुषंगाने तपास पथक पाठवून वर नमूद आरोपी मंगळ येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आलेली आहे. आरोपीत क्रमांक 1 अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केली तसेच अटकेबाबत त्याची मानलेली बहीण दिपाली राहणार मंगळवेढा यांना समज देण्यात आलेलो असून आरोपीच्या अंगझडतीत गुन्हयात वापरलेला मोबाईल हेण्डसेट तसेच चोरीतील रकमेपैकी 4210/- एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स