<em>आय.टी.सी.टी. कंप्यूटर सेंटर, पाटचे संचालक अमृत महाडिक सर यांना पितृशोक..!!</em>
कुडाळ । देवेंद्र गावडे
शनिवार । १६ जुलै,२०२२
कुडाळ तालुक्यातील पाट येथील आय.टी.सी.टी. कंप्यूटर एज्यूकेशन संस्थेचे संचालक श्री. अमृत महाडिक सर यांचे वडील..
श्री. अशोक नामदेव महाडिक यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. १३ जुलै, २०२२ रोजी रात्रौ ११.०० वा. निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
संपूर्ण महाडिक परिवारामध्ये यामूळे शोककळा पसरली आहे.
दशक्रिया विधी २२ जुलै रोजी तर बारावा दिवस कार्य २४ जुलै रोजी श्री. महाडिक सर यांच्या भैरववाडी, कुडाळ येथील निवास्थानी करण्यात येणार आहे.
कै. अशोक नामदेव महाडिक यांच्या पवित्र आत्म्यास चिरःशांती लाभो व महाडिक कुटूंबियांना यातून लवकरात लवकर सावरण्याचे बळ मिळो अशा भावना व्यक्त करत त्यांना साश्रूनयनपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)