ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
हडपीड स्वामी समर्थ मठाच्यावतीने शिलाई मशिनचे वाटप..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हडपीड स्वामी समर्थ मठाच्यावतीने शिलाई मशिनचे वाटप..!

प्रकाशन: 14 Jul 2022 05:22 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्या वतीने दहीबाव दळवीवाडी येथील गरजू महिला सौ. पूजा हेमंत दळवी यांना उदरनिर्वाहासाठी मठाच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांचा मुलगा साहिल हेमंत दळवी याला संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचा खर्च श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने केला जाणार असल्याचे मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व अध्यक्ष प्रभाकर राणे यांनी सांगितले. गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हडपीड येथील स्वामी समर्थ मठाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम नियमित राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सदर महिलेस शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी दिली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, श्री मधुसूदन भडसावळे,
श्री दीपक बाबू आईर तसेच श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मठामध्ये फुलांची आकर्षक सजावट नंदकुमार पेडणेकर व स्वामी भक्त यांनी केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स