ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चाफेड- गावठण मार्गे भोगलेवाडी तिठ्याजवळील रस्त्यावरील मोठा चर ठरतोय अपघाताचे कारण...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चाफेड- गावठण मार्गे भोगलेवाडी तिठ्याजवळील रस्त्यावरील मोठा चर ठरतोय अपघाताचे कारण...!

प्रकाशन: 13 Jul 2022 07:26 PM
वाचन संख्या 59

शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालु
क्यातील एकदम टोकाला वसलेला आणि कणकवली तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर भोगलेवाडी फाट्यावरील रस्त्याच्या मधोमध पडलेला भला मोठा चर सध्या वाहनधारकांसाठी फार मोठे अपघाताचे कारण ठरत आहे.
चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी हा मार्ग सुमारे १.८०० कि.मी. आहे. सध्या या रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यंदा या मार्गावरील चाफेड – साळशी या फाट्यापासून श्री कुलस्वामिनी मंदिरापर्यंत फक्त २२० मीटर डांबरीकरण झाले.मात्र उर्वरित पुढील घाडीवाडी पासून ते भोगलेवाडी फाट्यापर्यंत तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी,रिक्षाचालक यांना वाहने चालवताना खूप त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. दुचाकीस्वारांना तर वाहन चालवताना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडले देखील आहेत. एस. टि कशीबशी चालू आहे.ऐन गणेश चतुर्थी सणाला जर एस्टी वाहतूक बंद पडली तर ग्रामस्थांचे अतोनात हाल होणार आहेत. दरवर्षी या गावठणमधील ग्रामस्थ स्वखर्चाने अंगमेहनत घेऊन श्रमदान करून खड्डे बुजवितात. मात्र संबधित खात्याला किंव्हा लोकप्रतिनिधींना जरा सुध्दा दयामाया येत नाही.ही वस्तुस्थिती आहे.
रस्त्याच्या मधोमध पडलेल्या चरामुळे आणखीनच धोका वाढला
गावठणवासियांना नळपाणी योजनेसाठी पाईपलाइन टाकण्यासाठी भोगलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध जो चर खणण्यात आला त्यावर ठेकेदाराने व्यवस्थित सिमेंट न लावल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यावरील माती वाहून गेली आणि रस्त्याच्या मधोमध भलामोठा भगदाड पडला.त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा चर दिसत नाही. परिणामी भविष्यात अपघात घडण्याची दाट शक्यता वाहनचालकातून व्यक्त होत आहे.तरी संबधित नळपाणी योजनेच्या ठेकेदाराने हा चर लवकरात लवकर सिमेंट टाकून बुजून टाकावा. जेणेकरून भविष्यात कोणताही अपघात होणार नाही. अशी ग्रामस्थ मागणी करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स