<em>वैभवशाली निष्ठा….</em>
युवासेना प्रमुखांच्या निष्ठा यात्रेत आमदार वैभव नाईक सहभागी…
मुंबईत शिवसेनेच्या निष्ठा यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद..
मालवण | सुयोग पंडित :
युवासेनाप्रमुख व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गेले चार दिवस मुंबईमध्ये निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये फिरत असताना, या निष्ठा यात्रेला मुंबईच्या जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या निष्ठा यात्रेत कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक हे देखील सहभागी झाले. शिवसेनेला जनतेचे मुंबईत अजूनही भरभरून प्रेम आहे.
ज्या ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी भेटी दिल्या त्या ठिकाणी जनतेने तासनतास थांबून आदित्य ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. जरी काही आमदार शिवसेनेला सोडून गेले असले तरी आजही जनता व शिवसैनिक मात्र शिवसेने सोबत आहेत. त्यामुळे हाच प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रभर मिळेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)