ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>वेंगुर्ला मनसे ची शिरोडा ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज भेट…!</em>

<em>वेंगुर्ला मनसे ची शिरोडा ग्रामीण रुग्णालयास सरप्राईज भेट…!</em>

प्रकाशन: 13 Jul 2022 01:28 PM
वाचन संख्या 48

शिरगांव | संतोष साळसकर :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉक्टर प्रवीण देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक वस्तू उपकरणे, ह्याबद्दलचा आढावा घेतला.स्पेशालिस्ट डॉक्टर कधी पर्यंत उपलब्ध होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी हमी उपस्थित मनवीसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली.
स्वच्छता गृहामध्ये पारंपारिक टॉयलेट वर आजारी किंवा वृद्ध व्यक्तींना बसण्यास त्रास होत होता ते लक्षात घेऊन तालुका अध्यक्ष श्री सनी बागकर ह्यांनी स्वतःकडून एक टॉयलेट चेअर हॉस्पिटल साठी दान म्हणून दिली.
मनसे वेंगुर्ला च्या सदर शिष्टमंडळात, परशुराम उर्फ आबा परब,महादेव तांडेल,आबा चिपकर,रोहित म्हाकले,प्रथमेश नाईक आणि सूर्यकांत गावडे हे मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स