भाजयुमोचे संदीप गुप्ता यांचा मुंबई आराखडा…!
मालवण | विनीत मंडलिक :
भाजयुमोचे संदीप गुप्ता यांनी मुंबई महापालिकेला निवेदन दिले आहे की त्यांनी बैठ्या चाळीच्या १४ फुट उंची च्या जागी २० फुट उंची साठी कायदेशीररित्या परवानगी द्यावी. मुसळधार पावसाच्या परिस्थितीत जर लो लाईन एरिआ( सखल जलस्तरीय भौगोलिक क्षेत्रे) मध्ये पूरस्थिती निर्माण झाली तर, नागरिकांना आसपासच्या बिल्डिंग मध्ये स्थलांतरित करावे लागते त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून संदीप गुप्ता यांनी सर्व राजकीय पदाधिकार्यांना तसेच सरकारी अधिकार्यांना ह्या विषयावर लक्ष केंद्रित करून घर आणि छताची उंची वाढवून लोकांना सुरक्षित ठेवून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आपण टाळू शकतो असे म्हटले आहे . २००५ साली पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)