<em>गुरु पंच….एक सद्गुरु सरपंच!</em>
मालवण | संपादकीय विशेष : पाच महिन्यांपूर्वी आपल्या आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलसाठी सरपंचांचा प्रपंच मालिकेसाठी मालवण तालुक्यातील पळसंब गांवात गेलेलो.
गांवचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचा वेळ देत मुलाखत दिली.
पहिल्या भेटीतच “तळमळ” नावाची ओळख झाली.
युवा..हॅन्डसम..यशस्वी व्यावसायिक चंद्रकांत गोलतकर ही व्यक्ती किती “व्यापक” आहे ते एका मुलाखतीत मावणारच नाही हे मला नंतर कळत गेले.
सिंघम सिनेमातील एक डायलाॅग नम्र व्हर्जनमध्ये मला ऐकू येऊ लागला,” ये पळसंब गांव मेरा है और मै गांवका सरपंच..!”
सरपंच पदाची जगातली सर्वात शिष्टाचारयुक्त व्याख्या म्हणजे पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर..
गुरु शोधावा लागत नसतो.
अख्ख्या गावासाठी ऑरेंज अलर्ट असताना जीव धोक्यात टाकून बाहेर फिल्डवर येतो गुरु..
कुठलेही अनुकूल पर्यटन वातावरण नसताना पर्यटन मंत्र्यांसमोर गावचा आलेख मांडतो तो गुरु..
कोणाला आजारपण आलं तर स्वतःची कार काढून कोल्हापूरला गुरु नेतो..
विरोधक किंवा अविचारी न बघता एखाद्या “रोशनला” थेट सदर काढून देतो तो गुरु असतो .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदाचित वयाने सर्वात छोटा राजकारणी पण “खरा माणुस” चंद्रकांत गोलतकर यांना संपूर्ण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहातर्फे गुरु वंदना..
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)