<em>माड्याचीवाडी येथे १३ जुलैला गुरू पौर्णिमा उत्सव..!</em>
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
माड्याचीवाडी कुडाळ येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १३ जुलैला गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. श्री श्री १०८ महंत पं.पूं. सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आशिर्वाद, व गुरूसंदेश ऐकण्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सकाळी ५:०० वाजता संकल्प, सकाळी ७:०० वाजता अनुग्रह,
सकाळी ९:३० वाजता सत्यनारायण महापुजा, सकाळी११:००वाजता गुरूपाद्य पुजा, सकाळी ११:३० वाजता गुरूसंदेश,दुपारी १२:००वाजता सदगुरू दर्शन सोहळा,दुपारी १:०० वाजल्यापासून पासुन अंखड महाप्रसाद,सायंकाळी ७:००वाजता आरती रात्रौ८:००वाजता सुमधुर भजन होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी अध्यक्ष एकनाथ गावडे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)