आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार शिरोडकर यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन केले सांत्वन.
कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील पत्रकार व बिबवणे कुलकर्णीवाडी येथील रहिवासी उत्तम शंकर शिरोडकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज कै. उत्तम शिरोडकर यांच्या निवासस्थानी जाऊन शिरोडकर कुटुंबियांचे सांत्वन केले. “कै.उत्तम शिरोडकर यांनी गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम केले हरहुन्नरी पत्रकार बरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता, दिलदार माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पत्रकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे”, अशा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)