ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
आरोग्य सहाय्यिका विशाखा  गोसावी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आरोग्य सहाय्यिका विशाखा  गोसावी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार..!

प्रकाशन: 04 Jul 2022 05:36 PM
वाचन संख्या 73

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सर्वांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांचे वेळोवेळचे मार्गदर्शन आणि कुटुंबियायांचे पाठबळ यामुळे शासकीय सेवेतील कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करू शकले असे प्रतिपादन  प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदुरच्या आरोग्य सहाय्यिका सौ. विशाखा विश्वनाथ गोसावी यांनी पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केले.  त्या नियत वयोमानानुसार नुकत्याच सेवा निवृत्त झाल्या.  

सौ. विशाखा  गोसावी .


  प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर या ठिकाणी डाॅ. चिवडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ चिवडे म्हणाले,  विशाखा गोसावी या उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट काम करण्याची पद्धत, सहका-यांना मार्गदर्शन करणे, रेकॉर्ड टापटीप आणि व्यवस्थित ठेवणे, शासकीय प्रसंगातून योग्य मार्ग काढणे यासाठी श्रीम. विशाखा गोसावी या अनुभवी कर्मचारी  म्हणून कार्यरत होत्या. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्था येथे गेली दहा वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून श्रीम विशाखा गोसावी यांचे जवळ पाहिले जाते. असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सेवा काळात प्राथमिक आरोग्य केंद्र कडावल अधिनस्त पांग्रड, भुईबावडा-उंबर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिनस्त परुळे अधिनस्त म्हापण, हिर्लोक,मसुरे, पणदुर याठिकाणी त्यांनी सेवा बजावली.
यावेळी डॉ. काजरेकर, डॉ. खोत,श्रीम कुंदा पवार, आरोग्य सहाय्यिका, श्रीम. मुणगेकर, आरोग्य सेविका, श्रीम. धुरी, आरोग्य सेविका, श्रीम केळुसकर,श्रीम. वालावलकर, श्रीम. म्हसकर, श्रीम.श्वेता ठाकूर, श्रीम. वरक श्रीम.महानंदा गोसावी, श्रीम.धर्णे, श्रीम साळगावकर,श्रीम श्रृती कुंभार गटप्रवर्तक,श्रीम.रागीणी कुंभार गटप्रवर्तक,श्रीम.अनिता खुपसे परिचर, श्रीम. प्रिती कुंभार एन. सी. डी स्टाप, श्री.मदन मसके, श्री.प्रदिप दांडगे,श्री.धामणकर,श्री.शेटये श्री.तवटे,श्री.विलास गोसावी,श्री.विलास ठाकूर आरोग्य सहाय्यक,श्री.दत्तगुरु म्हसगे, श्री.पोळ श्री. रोशन चव्हाण, श्री. दत्ताराम गोसावी, श्री. बावलेकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स