मडुरा नाबर प्रशालेत कृषिदिन संपन्न.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम प्रशालेत कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाडलोस कृषि तंत्र विद्यालयाच्या सहशिक्षिका शालन गवस यांनी विद्यार्थ्यांना कृषि दिन व जीवनात झाडांचे महत्व यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)