कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : गेले दोन आठवडे अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेची पुनर्बांधणी केली जात आहे.
यामध्ये विधानसभा अध्यक्षपदी कोण असेल ही चर्चा होती.
अखेर कुलाब्याचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे असणारे नार्वेकर हे भाजपाचे एक अभ्यासू नेते म्हणून परिचीत आहेत.
आमदार राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)