ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शेर्ले केंद्रशाळेत वह्यांचे मोफत वितरण.

शेर्ले केंद्रशाळेत वह्यांचे मोफत वितरण.

प्रकाशन: 03 Jul 2022 08:49 PM
वाचन संख्या 81

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले गावचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे श्री. अरुण धुरी व त्यांच्या पत्नी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शेर्ले सर्व बालकांना मोफत मोफत वितरण केले. गेली ८ वर्षांपासून अखंडपणे धुरी कुटुंबियांकडून शाळेत मोफत वह्यांचे वितरण करीत आहेत. त्यांच्या या नि:स्वार्थी दातृत्वाचे शेर्ले सरपंच उदय धुरी, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.


यावेळी सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर शाळेस सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच समिती अध्यक्ष विठ्ठल शेर्लेकर, यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे सांगत शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. अरुण धुरी यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी झेंडे यांनी केले.
यावेळी गावचे सरपंच जगन्नाथ उर्फ उदय धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल शेर्लेकर,उपाध्यक्ष साईशा पराष्टेकर,समिती सदस्य सोनाक्षी मेस्त्री,साबाजी धुरी, तन्वी यादव, करूणा धुरी, सिद्धार्थ जाधव, समीक्षा आमडोस्कर, सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स