कुवळे येथील सेवानिवृत्त शिक्षक सदानंद घाडी यांचे निधन.
शिरगाव |संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कुवळे-घाडी वाडी येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक सदानंद पुनाजी घाडी(६२) यांचे सोमवार २७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील प्राथमिक शाळेत शिक्षकी सेवेला सुरुवात केली. त्यानंतर देवगड तालुक्यातील वळिवंडे व त्यानंतर कुवळे-तर्फे वाडी येथील प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त झाले.त्यांनी ३७ वर्षे शिक्षकी सेवा केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,विवाहित मुली,बहिण जावई वहिनी असा मोठा परिवार आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)