राज्य मंत्रिमंडळाने घेतले काही महत्वपूर्ण निर्णय...!
मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले काही निर्णय किती निर्णायक ठरतात ते पहाणे ही सध्या सामान्य महाराष्ट्र राज्य निवासी नागरिकांची उत्सुकता आहे. ते निर्णय खालीलप्रमाणे आहेत.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता
नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण
हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता कर्जत येथे दिवाणी न्यायालय स्थापण्यास मान्यता
विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठित करणार
ग्रामीण भागात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार
जमीन भोगवटादार रुपांतरण अधिसूचनेस दोन वर्षांची मुदतवाढ
बांद्रा शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या सदनिकांसाठी भूखंड मंजुरी.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)