<em>किसान मोर्चाच्या प्रसाद भोजने यांचा वाढदिवस शेताच्या बांधावर केक कापून साजरा….!</em>
चिंदर/विवेक परब :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, किसान मोर्चा मालवण मंडल उपाध्यक्ष प्रसाद भोजने यांचा ५७ वा वाढदिवस किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला, यावेळी मालवण तालुका किसान मोर्चाचे कार्यकर्ते सामुदायिक पद्धतीने हडी या गावी शेती करतात त्याच शेती बांधावर केक कापून प्रसाद भोजने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, हडी गावचे प्रथम नागरिक महेश मांजरेकर, किसान मोर्चा मालवण मंडळ अध्यक्ष महेश सारंग, सल्लागार हरिभाऊ केळुसकर,अंकिता अनिल लाड, मंगल मंगेश हडकर, अल्का साळकर, वनिता दिनेश हडकर आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी त्यांना पुष्पगुच्छ म्हणून सुपारीचे झाड देऊन शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)