कणकवली - जानवली येथील शिक्षक कॉलनीच्या आरक्षित जागेत विविध वृक्षांची लागवड..!
लोकमान्य मल्टिपर्पज – कणकवली शाखा,वनविभाग कणकवली, सरपंच ग्रा. पं. जानवली यांचा संयुक्त सामाजिक उपक्रम…!
शिरगाव/संतोष साळसकर :
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी शाखा – कणकवली, वनविभाग कार्यालय कणकवली व सरपंच ग्रामपंचायत जानवली यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून रोजी सकाळी ९ वाजता शिक्षक कॉलनी, जानवली येथील आरक्षित जागेत सामाजिक बांधिलकी जोपासत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी आस्थापनेचे कर्मचारी व ग्रामस्थांना लोकमान्य संस्थेविषयी सर्व माहिती देण्यात आली. याप्रसंगी वनक्षेत्रपाल राजेंद्र धुनकोकर, जानवली सरपंच सौ. शुभदा रावराणे, ग्रामसेवक सौ. अर्चना लाड, माजी प्राचार्य विजय वळंजू, लोकमान्य बँकेचे शाखा व्यवस्थापक सूनीलदत्त दळवी,उपशाखा व्यवस्थापक सौ. गौरी खानोलकर,अमित साळसकर,सौ. पूजा अवसरे,हर्षद राणे,तुकाराम गावडे,राजू राणे,सचिन राणे,दिलीप सावंत,श्री. करावडे, वनविभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)