ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिक्षा तोंडवळकर हीचा मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे सत्कार!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिक्षा तोंडवळकर हीचा मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे सत्कार!

प्रकाशन: 24 Jun 2022 04:16 PM
वाचन संख्या 77

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून 96.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु.दिक्षा तोंडवळकर हिचा मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण यांनी वेरळ मुणगेकरवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.यावेळी मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आपा चव्हाण, संस्थापक संतोष लुडबे, संचालक दादा वेंगुर्लेकर, मनोज खोबरेकर, संतोष नागवेकर, उद्योजक सागर वाडकर, सदस्य भाई नेरकर, जगदीश तोडणकर , कु.दिक्षाचे वडील सुमंत तोंडवळकर व आई समीक्षा तोंडवळकर, ओंकार तोंडवळकर, पत्रकार अनिल तोंडवळकर उपस्थित होते. मातृत्व आधार फाऊंडेशन ही संस्था संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असून या फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करुन त्याना पुढील शिक्षणाची प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात येते.शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरिब व गरजू विद्यार्थी नागरिक यांनाही फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते.या फाउंडेशनचा विस्तार जिल्ह्यात तीन व्हाट्सएप ग्रुप द्वारे पसरला असून त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यांत कार्यरत राहणे शक्य झाले आहे अशी माहिती अध्यक्ष आपा चव्हाण यांनी दिली.मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने कु.दिक्षा हीचा शिवप्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स