मालवण तालुक्यात २५ जून पासून कृषी संजिवनी मोहीम.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांचे मार्फत २५ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजिवनी मोहीम राबविण्याबाबत येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कृषी संजिवनी मोहीम राबविण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे.
सदर कालावधी खरीप पिकांच्या द्रुष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेव्दारे कृषी विभागाचे अधिकारी कृषी विध्यापिठाचे शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न केले जाणार.
याकरिता मालवण तालुक्यातील प्रतिदिनी चार कार्यक्रम याप्रमाणे चौवीस कार्यक्रम घेण्यात येणार असून १ जुलै रोजी मा.स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी क्रुषि दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सांगता करण्यात येणार आहे.
२५ जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन.
२६ जून रोजी पौष्टिक त्रुणधान्य दिवस.
२७ जून रोजी महिला क्रुषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस.
२८ जून रोजी खत बचत दिन.
२९ जून रोजी प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस.
३० जून रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस.
१ जुलै रोजी कृषी दिन, क्रुषि संजिवनी सप्ताह सांगता या प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
तालुक्यात क्रुषि संजिवनी मोहीम राबविण्याकरीता गुरामनगरी,सुकळवाड, त्रिंबक, पोईप,चाफेखोल,पेंडुर, रायगड,चुनवरे,आंबडोस,आंबेरी,आडवली, श्रावण,वराड,बागवाडी,कांदळगाव,चिंदर,कातवड,काळेथर,वायंगणी, किर्लोस,नांदरुख,कुंभारमाठ,कुडोपी शिरवंडे, तळगाव व मठबुद्रुक या गावांची निवड करण्यात आलेली आहे तरी समस्त शेतकरी बंधूंनी क्रुषि संजिवनी मोहीमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून सुधारीत आणि नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.विश्वनाथ गोसावी तालुका कृषी अधिकारी मालवण यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)