ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हर्षजन्म शोधताना…! (विशेष)

हर्षजन्म शोधताना…! (विशेष)

प्रकाशन: 24 Jun 2022 02:07 AM
वाचन संख्या 406

साळशी गांवच्या हर्षालीचा शैक्षणिक यशाचा हर्षोत्सव…!

शिरगांव | संतोष साळसकर (विशेष) : हर्षोत्सव हा आखता येत नाही तर तो घडतो. शैक्षणिक प्रणाली आणि यश याचा विचार करता तर तो ‘जडण घडण’ या प्रक्रियेमधून ..थोड्या घर्षणाने व बाह्यकारकांचा सामना करत करत घडत असतो. तो हर्षोत्सवच असतो पण त्यामागे ‘प्रतिकूल ते अनुकूल’ असे अनेक टाकिचे घाव असतात.

देवगड तालुक्यातील साळशी गावची कु.हर्षाली अनिल पवार हिनेही नुकताच एक हर्षोत्सव साजरा केलाय.

हर्षालीची घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची..आई गृहिणी..तर वडील गवंडी काम करून घरसंसार चालवितात.मोठा भाऊ अजूनही पुढील शिक्षण घेत आहे.याही परिस्थितीमध्ये हर्षाली हिने खूप मेहनत आणि जिद्द- चिकाटीच्या जोरावर यश मिळवत १० वी च्या परीक्षेत (८८.६० टक्के ) गुण मिळवत हायस्कूल मधे द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला.तिला याकामी आईवडिलांचे खूप प्रोत्साहन,सहकार्य मिळाले.
यश व अपयशापार कष्टाच्या आईबापपणाला वरील टक्क्यांची मानवंदना देताना तिच्या चेहऱ्यावर ‘हर्षोत्सव’ अगदी खुलून दिसत होता.
कु.हर्षाली अनिल पवार साळशी येथील मध्यामिक विद्यामंदिर ची ही विद्यार्थिनी आहे. तिला लहानपणापासून वकृत्व कलेची खूप आवड. तिची बुध्दीमत्ता लक्षणीय आणि चाणाक्ष असे तिचे गुरुजन पहिल्यापासूनच सांगतात. इयत्ता ९ वी मध्ये ऑनलाईन कथावाचन स्पर्धेत तिसरा क्रमांक आला तर वर्गात प्रथम क्रमांक आला. १० वी. मध्ये वकृत्व स्पर्धेत केंद्रस्तरीय प्रथम क्रमांक तर प्रभागस्तरिय द्वितीय क्रमांक आला.देवगड तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत “स्वच्छ्ता व आरोग्य ” या विषयावर तिसरा क्रमांक मिळाला. बॅ. नाथ पै. सेवांगण – मालवण यांच्या कथावाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. माझे कुटुंब माझी जबाबदारी” या ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांक मिळाला.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. इ. ६वी. मध्ये तिला गणित आणि इंग्रजी या विषयात प्रथम आल्याबद्दल तिला रोख बक्षिसेही मिळाली होती. केंद्रस्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल अनेक संस्थांच्यावतीने तिला प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. लांब उडी आणि गोळाफेक या क्रीडा स्पर्धेत प्रथम,द्वितीय क्रमांक तिला मिळाले.या तिच्या यशात संस्था चेअरमन सत्यवान सावंत, मुख्याध्यापक माणिक वंजारे,वर्गशिक्षक पुरुषोत्तम साटम यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. तर आईवडिलांचे सहकार्य,प्रोत्साहन, मार्गदर्शन ही मिळाल्याचे हर्षाली आनंदाने सांगते.
भविष्यात हर्षाली हिला १२ वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. नंतर तिला शिक्षिका किव्हा नर्सिंग मधे करियर करून समाजाची सेवा करायची आहे. हर्षालीला उत्तम प्रकारे शिवणकला ही अवगत आहे. आज ती या लहान वयात उत्तमप्रकारे महिलांचे कपडे शिवते.अभ्यासात हुशार..न मनमिळाऊ स्वभाव… आईवडिलांच्या कष्टाची जाण.. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले…या सर्वांची जाण हर्षालीला आहे. म्हणूनच हर्षाली सांगते की मी माझे शिक्षण पूर्ण करून मला शिक्षिका किव्हा नर्सिंग करून मेडिकल ला जायचे आहे. मला समाजातील दीन दुबळ्या लोकांसाठी सेवा करायची आहे.

हर्षोत्सवाची पहिली मोठी पायरी हर्षालीने गाठली आहे आणि आपल्यासोबत अनेकांना तो हर्षोत्सव साजरा करायची संधी व प्रेरणा दिली आहे.
हर्षजन्म शोधणे हेच मानवजातीचे काम आहे असे म्हणतात आणि त्याच कामाला तिला भविष्यासाठी अनेक स्तरातून शुभेच्छा मिळतायत आणि म्हणतायत,”हर्षाली हर्षोत्सव साजरा करत रहा…हा हर्षजन्म शोधताना!”

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स