ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अनधिकृत बांधकामाचे बादशाहा असलेले नाईक आपली बांधकामे पाडण्याची हिम्मत दाखवतील का?
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अनधिकृत बांधकामाचे बादशाहा असलेले नाईक आपली बांधकामे पाडण्याची हिम्मत दाखवतील का?

प्रकाशन: 23 Aug 2021 01:57 PM
वाचन संख्या 55

भाजपा नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा सवाल

प्रतिनिधी । उमेश परब : राणेंवर टीका करून उद्धव ठाकरे यांचे मंत्रीपदासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी गेले काही दिवस आमदार वैभव नाईक हे सातत्याने खटाटोप करत आहेत. राणेंचा बंगला पाडण्याचे आव्हान देणारे वैभव नाईक हे कणकवली शहरातील त्यांची असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची हिम्मत दाखवतील काय? असा सवाल भाजपचे नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. आमदार वैभव नाईक यांची एक नाही तर अनेक अनधिकृत बांधकामांची यादी आमच्याजवळ आहे. त्यात करून नगरसेवक सुशांत नाईक यांच्या अनेक अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तर उपोषण हे देखील झालेली होती. त्यातील काही प्रकरणात न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले आहेत. सुशांत नाईक यांनी त्या उपोषणा वेळी गयावया केल्याने ती उपोषणे थांबली होती. राणेंवर टीका करून आपण प्रकाशझोतात राहू पाहणाऱ्या वैभव नाईक यांना त्यांच्या नगरसेवक असलेल्या भावापासून त्यांच्या स्वता च्या अनधिकृत बांधकामांची हवी तर यादीच आमच्याकडे आहे. हिम्मत असेल तर ही अनधिकृत बांधकामे स्वतःहून पाडण्याची तयारी नाईक दाखवतील काय? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना किंवा त्यांच्यावर अनधिकृत बांधकामाचे आरोप करत असताना स्वतः आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी त्यांच्या बंगल्यापासून नदीचे असलेले पात्र याचे साईड मार्जिन सोडलेले आहे का? स्वता चा बंगला वाचविण्यासाठी हायटेन्शन लाईन शिफ्टिंग साठी शासनाचे कोट्यावधी रुपये वाया घालवले. हे देखील सर्वांना माहिती आहे. अनधिकृत बांधकामाचे बादशहा म्हणून आमदार वैभव नाईक व त्यांच्या भावांना कणकवलीत ओळखले जाते. त्यामुळे राणेंना आव्हान देण्यापेक्षा नाईक यांनी आपली अनधिकृत बांधकामे तोडण्याच्या आमच्या आव्हानाला स्वीकारण्याची हिम्मत दाखवावी असा टोला श्री परुळेकर यांनी लगावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स