<em>कु. विद्या दत्तप्रसाद वालावलकर ९९.२०% गुण प्राप्त करत कुडाळ हायस्कूल प्रशालेमधून 'प्रथम'..!!</em>
कुडाळ तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ‘द्वितीय’ क्रमांक पटकावला..!!
नेरूर । देवेंद्र गावडे
रविवार । १९ जुन २०२२
कुडाळ हायस्कूल, कुडाळची गुणवंत विद्यार्थिनी कु. विद्या दत्तप्रसाद वालावलकर हीने शालांत परीक्षेमध्ये 99.20% गुण प्राप्त करत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
तीच्या या दैदिप्यमान शैक्षणिक यशाचे जिल्हाभरातून भरभरून कौतुक होत आहे.
कु. विद्या वालावलकर ही कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची सुकन्या असून आज नेरूर गावचे सरपंच श्री. शेखर गावडे व उपसरपंच श्री. समद मुजावर यांनी तीच्या नेरूरमधील निवासस्थानी भेट घेऊन कु. विद्याचे व पालकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी नेरूर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे, नेरूर गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर गावडे, उमाकांत तांबे, अशोक गावडे, राजा शृंगारे, विनय गावडे, बाळ करलकर, सौरभ माळवदे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळेस सर्वांनी कु. विद्याच्या यशाबद्धल आनंद व्यक्त केला व तीच्या भावी यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)