ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>खारेपाटण-वेळगिवे-शिरगाव मार्गे साळशी-कुवळे रस्त्याचे नुतनीकरणाचे काम मंजूरी अभावी रेंगाळले..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>खारेपाटण-वेळगिवे-शिरगाव मार्गे साळशी-कुवळे रस्त्याचे नुतनीकरणाचे काम मंजूरी अभावी रेंगाळले..!</em>

प्रकाशन: 18 Jun 2022 05:05 PM
वाचन संख्या 59

जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य..!

शिरगाव | संतोष साळसकर :

देवगड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ९ खारेपाटण वेळगीवे-शेवरे-शिरगाव-साळशी-कुवळे रस्त्यावरील शिरगाव-साळशी रस्ता येथील नुतनीकरणाचे काम मंजूरी अभावी रेंगाळले आहे.

हा मार्ग देवगड, कणकवली, मालवण असे तीन तालुके जोडणारा असून अधिक महत्वाचा आहे.

बारमाही सतत वाहतूकीची वर्दळ असते. पर्यटनदृष्टया पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जाताना वाहनधारकांना अत्यंत सोयीचा ठरणारा आहे.

अंतर कमी झाल्याने प्रवाशांची वेळ व इंधन दोन्हीची बचत होते. यामुळे प्रवासी रस्त्याने प्रवास करण्याला जास्त पसंती देतात.

खासगी वाहनधारक तसेच सार्वजनिक ए.स.टी. वाहतुक मोठया प्रमाणावर चालू असते.

परंतू पहिल्या पावसात सुरवातीलाच शिरगाव-साळशी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गटारे बुजलेली आहेत. झाडी वाढलेली आहे. यामुळे वाहतूकीमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.

या रस्त्यावरील समस्या सोडविण्यासाठी दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी साळशी ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन दिले गेले होते.

त्याची पुढे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधे नाराजी व्यक्त केली जात आहे.
आता पावसाळ्यात या रस्त्यावरील अडचणी अधिक वाढल्याने वाहतुक करताना कसरत करावी लागत आहे.

संबधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत देखभाल दुरूस्ती करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स