<em>वायंगणी हायस्कूलचे घवघवीत यश…!</em>
चिंदर | विवेक परब-
श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व १८ विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १००टक्के लागला आहे.या शाळेतून जयेश साईप्रसाद खोत याने 81% टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. भागोजी राजेंद्र साळकर ने 78.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर मधुरा दामोदर घाडीगांवकर हिने 76. 40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)