<em>इयत्ता बारावीचा निकाल जाहिर..कोंकण विभाग पून्हा अव्वल..!!</em>
कोंकण विभागाची यशस्वी निकालाची परंपरा कायम..!!
कुडाळ | देवेंद्र गावडे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच HSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. 94.22 टक्के एवढा राज्याचा निकाल लागला आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे कोकण पहिल्या स्थानावर आहे. कोकणाचा निकाल 97.21 टक्के एवढा लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 नंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
https://www.mahahsscboard.in/ आणि www.hscresult.mkcl.org या दोन वेबसाईटवर विद्यार्थी दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहू शकतात.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येतील.
विभागवार निकाल :-
कोकण : 97.21 टक्के
पुणे : 93.61 टक्के
नागपूर : 96.52 टक्के
औरंगाबाद : 94.97 टक्के
मुंबई : 90.91 टक्के
कोल्हापूर : 95.07 टक्के
अमरावती : 96.34 टक्के
नाशिक : 95.03 टक्के
लातूर : 95.25 टक्के
एकूण निकाल : 94.22 टक्के
फेब्रुवारी-मार्च http://localhost/news/public/uploads/2020 मध्ये बारावीचा निकाल 90.66 टक्के होता. त्या तुलनेत यावर्षी निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
मुलींची १२वीच्या निकलात बाजी..!!
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत सुरू होत्या. यंदा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी 8 लाख 17 हजार 188 मुलं आणि 6 लाख 68 हजार 3 मुली आहेत.
14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.21 टक्के इतका लागला आहे.
कोरोना आरोग्य संकटात दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच बारावी HSC बोर्डाची परीक्षा ऑलाईन पद्धतीने घेण्यात आली.
कोरोना काळात दोन वर्ष परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. शाळाही बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही आव्हानं वाढली होती, अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्याचं टेंशन विद्यार्थी आणि पालकांना होतं.
या सर्व विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
शिवाय, वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्कीटेक्चर, नर्सींग, अशा विविध क्षेत्रात प्रवेशासाठीही सीईटीसोबतच बारावी परीक्षेलाही महत्त्व असतं.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल.” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीचे आपली सिंधुनगरी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन..!!
🌹🌹🌹🌹🌹
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)