ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रस्त्याच्या बाजूला केलेली खोदाई पावसाळ्यात बनणार वाहनचालकांना धोकादायक...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रस्त्याच्या बाजूला केलेली खोदाई पावसाळ्यात बनणार वाहनचालकांना धोकादायक...!

प्रकाशन: 08 Jun 2022 09:30 AM
वाचन संख्या 29

वळणावर अपघाताची शक्यता,याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष…!

बांदा | राकेश परब :
पावसाळ्यात धोकादायक बनणाऱ्या मडुरा येथील पाईपलाईन चर खोदाईकडे अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या मधोमध खोदाई केलेल्या ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण केले नसल्याने चर खोदाई पावसाळ्यात धोकादायक बनणार असून प्रशासनाने याकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष देण्याची मागणी संतप्त प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.
बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस ते मडुरा दरम्यान दोन ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोदाई करून त्यावर केवळ मातीच्या सहाय्याने मलमपट्टी करण्य़ात आली. मडुरा रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग व बांदा-शिरोडा मार्ग ज्या ठिकाणी जोडतो त्याच ठिकाणी खोदाई केल्याने धोका अधिक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशा धोकादायक कामांकडे दुर्लक्ष झाल्याने अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
पाऊस सुरू झाल्यास संपूर्ण मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरणार असून वाहने घसरण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात याच ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झाला होता. पाडलोस ग्रा.पं.माजी सदस्य हर्षद परब व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब यांनी त्या दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले. परंतु अशा घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता तात्काळ लक्ष देऊन खोदाई केलेल्या चरावर खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी हर्षद परब यांनी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स