ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
नितेश राणेंच्या कार्यप्रणालीला कंटाळून भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : सतीश सावंत
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नितेश राणेंच्या कार्यप्रणालीला कंटाळून भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : सतीश सावंत

प्रकाशन: 22 Aug 2021 06:36 PM
वाचन संख्या 347

हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कणकवली / प्रतिनिधी : कोणीही कितीही जनाशीर्वाद यात्रा काढल्या तरी जनाधार हा फक्त शिवसेनेला आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून आज भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना करणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
हळवल गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी कोकण सिंचन उपाध्यक्ष संदेश पारकर, नीलम पालव, बाळा भिसे, शैलेश भोगले, बंडू ठाकूर, संदेश पटेल, सचिन सावंत, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, सुशांत दळवी, भास्कर राणे, मारुती सावंत, उत्तम राणे, माजी सरपंच स्मिता परब, गणेश राणे, अरुण राणे, रोहित राणे, विकास गुरव, सौरभ सावंत,अमोल परब दिलु राणे, आप्पा ठाकूर, प्रभाकर राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे भाजप वरचा लोकांचा अविश्वास वाढत चालला असून त्यामुळेच आजचा हा प्रवेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे. याच जिल्ह्यातील जनतेने राणेंचा तीन वेळा पराभव केला आहे. भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि जनता राणेंचा पराभव करणार हे निश्चित आहे.
यावेळी हळवल गावातील तुलसी पालकर, माजी ग्रा. प सदस्य प्रमिला चव्हाण, रेश्मा चव्हाण, प्रणिता चव्हाण, मनीषा चव्हाण, आरती चव्हाण, प्रणिता पंडित, समता सदानंद सावंत, स्नेहा धुरी, राजश्री मळगावकर, संपदा राणे, एकनाथ मडवळ, सचिन ठाकूर, सदानंद सावंत, दिलीप हळवलकर, रामदास चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर चव्हाण, प्रभाकर चव्हाण, दयानंद चव्हाण, मयूर पांगूळ, प्रथमेश राणे, राजन चव्हाण, अनंत चव्हाण, चैतन्य नाईक, लक्ष्मण सावंत, प्रवीण चव्हाण, किशोरी पाताडे, सूरज राणे, मयूर ठाकूर, सुशील ठाकूर, वसंत ठाकूर, शुभांगी तावडे आदी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स