चिंदर ग्रामपंचायत येथे शेतकरी दिन साजरा
चिंदर | विवेक परब : आशिया खंडातील पहिला साखर कारखाना, शेतकऱ्यांसाठी भरीव काम, शेतक-याचे कैवारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला सरपंच सौ.राजश्री कोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे शेतकरी दिन आज साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक उंची वाढविण्यासाठी पद्मश्री डाँ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. त्याच्या शेतकऱ्यांनसाठीच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री हि पदवी बहाल करण्यात आली आहे. पद्मश्री डाँ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांन करिता भरीव कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांचा जन्म दिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा केला जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप कृषी सेवक सुनिल कदम यांनी केला तर सरपंच सौ. राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, दयाळ भाऊ अपराज यांनी आपले विचार मांडले, यावेळी उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, तंंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, कृषी मित्र गोपाळ लब्दे, भाई तावडे, रवी नातु, सुनिल घुमडे, सागर अपराज, मयु मसुरकर, किस्तु फर्नांडीस, पारकर, दिशु पडवळ, रणजित दत्तदास हे उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)