ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा दणका
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा दणका

प्रकाशन: 22 Aug 2021 03:15 PM
वाचन संख्या 69

ट्रकसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली | उमेश परब : उपवनसंरक्षक नारनवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या जळाऊ लाकूड वाहतुकीला फोंडाघाट वनपाल अनिल जाधव व वनविभागाच्या पथकाने दणका दिला असून अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक व लाकूड असा तब्बल ९ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रकमालक राजेश रमेश राणे, रा.बैरीबांबर, ता.राधानगरी, व चालक अजय धोंडीराम कोंडवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडाघाट एरिगेशन कॉलनीमधून ट्रक क्र. एम . एच . ११ ए . एल . ००२९ मधून इंजायली जळाऊ लाकूडाची विनापरवाना वाहतूक होत होती. २१ ऑगस्ट रोजी वनविभागाचे पथक रात्रीची गस्त घालत असताना सदर ट्रक जप्त करून आतील जळाऊ लाकुडासह ट्रक वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. ९ लाख रुपये किंमतीचा ट्रक व ५० हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत वनरक्षक मनेर, शेगावे, सुतार, राठोड, राख, शिर्के, बागवे, लाड आदी सहभागी होते. पुढील तपास कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स