ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा-दोडामार्ग रस्त्याची दुरुस्ती गणेश चतुर्थी पुर्वी न केल्यास जन आंदोलनाचा भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांचा इशारा

बांदा-दोडामार्ग रस्त्याची दुरुस्ती गणेश चतुर्थी पुर्वी न केल्यास जन आंदोलनाचा भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांचा इशारा

प्रकाशन: 22 Aug 2021 10:24 AM
वाचन संख्या 92

बांदा |प्रतिनिधी : बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरणाचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. गणेश चतुर्थी पूर्वी पावसाळी डांबर वापरून तातडीने खड्डे बुजविण्यात येतील असे कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी लेखी दिले होते. परंतु एक आठवडा उलटून गेला तरी पावसाळी डांबराने भरण्यात येणारे खड्डे अद्याप भरले नसल्याने जन आंदोलनाचा इशारा भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी प्रसिद्ध पत्रकातून कळवले आहे.

बांदा-दोडामार्ग हा रस्ता दुरुस्ती व्हावा यासाठी अनेकवेळा भाजप पक्षाने आंदोलने केली होती .परंतु याची पालकमंत्री आणि प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नसल्याने आठवड्यापुर्वी भाजपाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी लेखी आश्वासन दिले होते.
कोकणातील सर्वांत मोठा असा गणेश चतुर्थी चा सण तोंडावर आला आहे आणि अशा वेळी बांदा-दोडामार्ग रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेश मुर्ती पण याच रस्त्यावरून वाहन करुन घरी नेण्यात येणार आहेत परंतु खड्डे अजुन बुजवण्यात आले नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे.आंदोलनाच्या वेळी  सावंतवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. सदर रस्ता मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. आणि त्यापूर्वी पावसाळी डांबर खड्डे तातडीने भरण्याचे आश्वासन आश्वासनाची पूर्तता न झाल्यास गणेशोत्सवापूर्वी जन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप सावंतवाडी उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत  यांनी दिला आहे. यावेळी निलेश पटेकर, विकी कदम, संदेश महाले उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स