ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आजपासून मासेमारी सुरू

नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आजपासून मासेमारी सुरू

प्रकाशन: 22 Aug 2021 11:06 AM
वाचन संख्या 57

१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीला खवळलेल्या समुद्राला बसला होता लगाम

मालवण | वैभव माणगावकर :- सागरी मासेमारीला शासकीय नियमानुसार जरी १ ऑगस्टपासून अधिकृतरित्या सुरुवात झाली असली, तरी कोकण किनारपट्टीवर मात्र आज नारळीपौर्णिमेपासूनच खऱ्या अर्थाने मासेमारीचा श्रीगणेशा होणार आहे. कोळी बांधव आज पारंपरिक पद्धतीने दर्याचे पूजन करून व दर्याला नारळ अर्पण करून आपल्या मासेमारी नौका दर्यात लोटणार आहेत.
पूर्वीपासून नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नौका मासेमारीसाठी समुद्रात जातात. मात्र, गेल्या ५ वर्षात १ ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू होते. त्याचबरोबर १ ऑगस्ट पासून पारंपरिक नौकांची मासेमारी सुरू होते. त्याचबरोबर १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. मागील मोसमात एक ते दोन महिने नैसर्गिक कारणांमुळे मच्छिमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाही. गेली काही वर्षे हीच अवस्था आहे. आता यंदाच्या हंगामात सागराची पूजा-अर्चा करून आणि श्रीफळ अर्पण करून नौका समुद्रात लोटली जाणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स