पूर्व परीक्षेत महावितरण नापास...!
कणकवली | बंटी राणे : मान्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गायब झाली. गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडला आणि वीज गायब झाली मान्सून पूर्वी पडलेला हा पाऊस म्हणजे महावितरण विभागासाठी एक परीक्षाच होती कारण मान्सून सुरू झाला की झाडे पडणे पोल कोसळणे आणि त्यामुळे वीज गायब होणे हे प्रकार सर्रास पहायला मिळतात. मात्र मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीत कणकवली तालुक्यातील अनेक गावात वीज गायब झाली होती. सायंकाळच्या सुमारास गायब झालेली वीज रात्री पर्यंत गायबच होती. कुठे झाडे पडली तर कुठे शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रकार घडले होते. उन्हाच्या काळात ह्या समस्यांचे निवारण करणे गरजेची बाब आहे मात्र सुशेगात असलेल्या महावितरण प्रशासनाला पाऊस पडल्यानंतर समस्यांची जाणीव होते. आणि नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो गर्मीच्या दिवसात सुमारे 4 ते 5 तास वीज गायब आसल्याने दिवस भर थकलेल्या दमलेल्या नागरिकांना रात्र देखील मच्छर आणि गर्मीच्या वातावरणात काढावी लागली. उन्हाळ्याच्या काळात डोकेदुखी ठरणाऱ्या समस्या दूर केल्या तरच महावितरण विभाग मान्सून पूर्व परीक्षेत पास होऊ शकते हे मात्र नक्की…
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)