कासार्डे- पियाळी- फोंडा रस्ता बनला वाहतुकीस धोकादायक, अपघातास निमंत्रण देणारा...
वाहन चालकांनी दक्षता घेण्याचे सिद्धेश राणे यांचे आवाहन…!
कणकवली | बंटी राणे : कासार्डे- पियाळी- फोंडा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ या रस्त्यावर नुतनीकरणाचे काम गेले दोन महिने चालू आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी डांबरीकरण तर काही ठिकाणी फक्त खडीकरण आणि त्यावर माती टाकल्याने आज या परिसरात पावसामुळे रस्ता दुचाकी आदी छोट्या वाहनांसाठी धोक्याचा बनला आहे. या मार्गावर दररोज शेकडो ट्रक सिलीका वाहतूक करतात. परिणामी रस्ता आजच्या रिमझिम पावसात डांबरीकरणापूर्वीच दलदलीचा बनला आहे. तसेच पियाळी ते फोंडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
तरी या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या विशेषतः छोट्या वाहनचालकांनी वाहने जपून चालवावी व अपघात टाळावेत असे आवाहन शिवसेना फोंडा युवा विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)