<em>जिल्हा नियोजन समितीवर भाजपचा बहिष्कार …!</em>
आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती…!
ठाकरे सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्या सहित सिंधुदुर्ग जिल्हाचा विकास ठप्प-भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल..!
वैभववाडी | नवलराज काळे :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेले विकासकामाचे ६५ कोटी रुपये. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात येऊन या जिल्हासाठी देण्याचा शब्द पाळला नाही. ठाकरे सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्याचा आणि जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. वादळातील नुकसान भरपाई अजूनही दिली नाही. रस्त्यांची कामे ठप्प आहेत. ठेकेदाराचे पैसेच न मिळाल्याने रस्ते अपूर्ण आहेत त्यातच पालकमंत्री उदय सामंत यांची मनमानी सुरुच आहे. जिल्हातील विकास कामांच्या याद्या मंजूर करताना विश्वासात घेतले जात नाही, या याद्यांवर केवळ पालकमंत्र्यांचीच सही आहे जिल्हाधिकार्यांनी या याद्यांवर सही करण्यास टाळले आहे. या पालकमंत्र्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे आपण आजच्या जिल्हा नियोजन समिती सभेवर बहिष्कार घातल्याचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
जिल्हा नियोजन समितीची १० जानेवारी नंतर तब्बल पाच महिन्यांनी ही सभा होत आहे. मात्र पालकमंत्री उदयसामंत यांची सभाशात्र व शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सूचना डावलून मनमानी कार्यपध्दती बाबत आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार नितेश राणे यांची या सभेच्या प्रारंभीच पत्रकार परिषद होत भाजपाच्या वतीने राज्य सरकार चा कारभार, खोळंबलेली विकासकामे, तोक्ते चक्रीवादळात झालेली व न मिळालेली नुकसान भरपाई, अर्धवट असलेले रस्ते, ठेकेदारांची देय रक्कम न मिळाल्याने रखडलेल्या रस्तांची कामे, पशुपक्षी प्रदर्शनात झालेली उधळपट्टी यामुळे जिल्हावासीय नागरिकांना या कारभाराची मोठी झळ बसली आहे. याकडे नितेश राणे यांनी लक्ष वेधले.
खरेतर जिल्हा नियोजन समीती सभेत विकासावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन सभेत अशी चर्चा होताना दिसत नाही. तब्बल पाच महिन्यांनी सभा घेतांना या सभेची व कामांची कार्यपद्दती पालकमंत्री शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही. विकास कामे मंजूर करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. ज्या कामांच्या याद्या मंजूर करतांना पालकमंत्र्यांची मनमानी आहे. त्यावर त्यांच्याच सह्या आहेत. जिल्हाधिकार्यांच्या सह्या या याद्यांवर नाहीत. त्यांनी त्या करायच्या टाळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकार्यांनाही पालकमंत्र्यांचा हा मनमानी कारभार मान्य नाही असेही यातून उघड होते असेही आम. नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाच्या पुरहानी कामाच्या याद्यांही पालकमंत्र्यांनी मनमानी करत ही कामे मंजूर केली. सुस्थितील अन नादुरुस्त रस्ते याचीही पडताळणी केली नाही. त्यामुळे खरोखरच नादुरुस्त रस्ते दुर्लक्षित राहीले. याकडेही नितेश राणे यांनी लक्ष वेधले.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक असून, पालकमंत्र्यांनी अधिकार्यांवर दबाव टाकून घाईगडबडीने कृषी पशु पक्षी प्रदर्शन भरवीले. शेतकर्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त न ठरता या कडे शेतकर्यांनी पाठ फिरवीली. मे महिन्यात अखेरच्याक्षणी हे प्रदर्शन घाईगडबडीने घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असेही आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट करून या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)