ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्गच्या भाषा तज्ञ व साहित्यिका अनुराधा दिक्षित यांचा पुणे येथे झाला विशेष गौरव…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्गच्या भाषा तज्ञ व साहित्यिका अनुराधा दिक्षित यांचा पुणे येथे झाला विशेष गौरव…!

प्रकाशन: 17 May 2022 10:21 PM
वाचन संख्या 142

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा पडेल येथील माजी शिक्षिका , सुप्रसिद्ध साहित्यिका व मराठी,इंग्रजी,हिंदी व संस्कृत भाषेच्या तज्ञ सौ.अनुराधा दिक्षित यांचा पुणे येथे देवधर मंडळाच्या संमेलनात विशेष गौरव करण्यात आला.
या संबंधीची माहिती सौ.अनुराधा दिक्षित यांनी नुकतीच त्यांच्या डिजिटल सामाजिक मंचावरुन त्यांच्या वाचक चाहत्यांना, सह साहित्यिक, लेखकांना व माजी विद्यार्थ्यांना दिली आहे.

Article image
Article image

सौ. अनुराधा दिक्षित यांनी,हा पुरस्कार अनपेक्षित आणि सुखद धक्का देणारा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अतिथी महारथी माणसांच्या मांदियाळीत मिळालेला हा सन्मान डाॅ.दिलीप देवधर यांसारख्या सेवाभावी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तिच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला हा आनंद काही औरच असल्याचे त्यांनी सांगितले . ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला त्या खुद्द नलिनी देवधर आजी ह्यांच्या हस्तेच तो मला मिळाला,ह्याचा मला खूप आनंद आहे अशा भावना सौ.अनुराधा दिक्षित यांनी व्यक्त केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिर्लोटचेच असणारे श्री.नरेश दीक्षित यांच्याही कार्यकर्तृत्वाचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.त्यामुळे आनंद द्विगुणित झाला.दोन्ही पुरस्कार देवगड तालुक्यातील दोघांना मिळाला या बद्दल त्यांनी देवधर मंडळाचे आभार मानले. ह्या कार्यक्रमाला अभिनेत्री सायली देवधर,लग्नाची बेडी फेम हिचीही उपस्थिती अनपेक्षित आणि आनंददायी होती अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या गौरवाबद्दल सौ.अनुराधा दिक्षित यांची देवगड,सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या विविध स्तरांतून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स