मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 चा दुसरा दिवस ठरला ग्लॅमरस..!
स्थानिक युवतींचा आत्मविश्वास वाढवणारा रॅम्पवाॅक ठरतोय प्रशंसेचा विषय.
आमदार वैभव नाईक,मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांसह लोकप्रतिनिधींची सहकुटुंब सोहळ्याला सात्विक उपस्थिती ठरली विशेष आकर्षण.
मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 चा दुसरा दिवस नवरसातल्याच पण थोड्या आधुनिक ‘ग्लॅम’रसाने भरलेला ठरला.
कराओके गायन कार्यक्रमात सहभागी होऊन स्थानिक हौशी गायकांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकलव्य बनून स्वतः केलेल्या यथाशक्ती गायन रियाज़ाची सादरीकरणे झाली. दांडी येथील स्थानिक सागरी पर्यावरण अभ्यासक जगदीश तोडणकर यांचे सादरीकरण हे वैशिष्ट्य ठरले.
दुसर्या दिवशीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरली ती खेळ पैठणीचा ही स्पर्धा. माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी त्यात सहभाग नोंदवला व त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
त्यानंतर बहुप्रतिक्षीत मालवण सुंदरी स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण 17 युवती सहभागी झाल्या .
रॅम्पवाॅक , वैचारिक,वैयक्तिक व सामाजिक ग्रुमींग व परिक्षकांचे प्रश्न अशा स्तरावर ही स्पर्धा आयोजीत झाली. स्पर्धेसाठी स्थानिक मूलाच्या व स्थानिक अशा युवतींचा सहभाग आत्मविश्वासाने होता. कोरीओग्राफर रुपेश यांनी त्यांच्या साठी सराव सत्रे घेतली होती.
परिक्षकांची भूमिका, इव्हेंट मॅनेजमेंटचे तज्ञ व समाज समन्वयक प्रणय तेली आणि कुडाळच्या डाॅ.सायली प्रभू यांनी निभावली. कंटेंट रायटर निखील खानोलकर व सहकार्यांनी या स्पर्धेसाठी उल्लेखनीय योगदान दिले.
या स्पर्धेत सहभागींसाठी बेस्ट स्माईल,बेस्ट रॅम्पवाॅक,बेस्ट हेअर व मिस फोटोजिनिक असे व इतर पुरस्कार स्मृतीचिन्ह व सॅश स्वरुपातही होते. विजेत्यांना व सहभागी स्पर्धक युवतींना नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी श्री पाटकर, परिक्षक प्रणय तेली व डाॅ. सायली प्रभू, माजी नगरसेवक यतीन खोत,माजी नगरसेवक मंदार केणी ,माजी नगरसेवक पंकज सादये,जि प सदस्य हरी खोबरेकर व इतर मान्यवरांनी सन्मानित करत पुरस्कार दिले
महाराष्ट्र भूषण पत्रकार व वृत्तनिवेदक ॠषी देसाई यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन केले. त्यांच्या सूत्रसंचालनातून स्थानिक स्तरावर घडणारे अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांनाही अत्यंत ग्लॅमरस स्वरुपात पण नर्म जबाबदारीने हात घातला गेला. गावची मूल निवासी व सध्या मुंबई भांडुप येथे असणारी ॠतुजा राणे हिने मालवण सुंदरीचा बहुमान पटकावला.
महाराष्ट्र भूषण पत्रकार व वृत्तनिवेदक ॠषी देसाई यांनी प्रेक्षकात जात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्याशी थेट संवाद साधला.
सूत्रसंचालक ॠषी देसाई, नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी वृंद यांच्या आग्रहाखातर नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा त्यांच्या पत्नीसह रॅम्पवाॅक केला.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सर्वांच्या आग्रहाखाचा मान राखत सुस्वर गायन केले. त्याला माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत व सहकार्यांनी दाद देत बक्षिसे दिली. नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या पत्नी सौ.स्मृती महेश कांदळगांवकर यांच्यासह रॅम्पवाॅक केला. माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी ,नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व माजी नगरसेवक पंकज सादये यांनीही रॅम्पवाॅक केला. मूळ शरीरसौष्ठवपटू असणार्या यतीन खोत यांच्या अनेक शरिर सौष्ठव स्पर्धेच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. सिधुरत्न कला मंच तर्फे समूह नृत्य व नगरपरिषदेच्या अधिकारी गीतांजली नाईक यांनी गुजराती नृत्य सादर केले व नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी तसेच माजी नगरसेवकांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक , त्यांच्या सौभाग्यवती व कन्या , नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व त्यांच्या पत्नी सौ.जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व त्यांच्या पत्नी सौ.स्मृती महेश कांदळगांवकर, जि प सदस्य हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत व त्यांच्या पत्नी व समाजसेविका,सिंधुरक्त प्रतिष्ठानच्या सौ. शिल्पा यतीन खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व मंदार केणी व त्यांच्या पत्नी व रोजरी इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका सौ. मृदुला मंदार केणी,नगरसेवक पंकज सादये , नगरसेविका सेजल सन्मेष परब व समाजसेवक सन्मेष परब,नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, शहर युवा नेते मंदार ओरसकर व इतर लोकप्रतिनिधी,त्यांचे कुटुंबिय,मित्रपरिवार उपस्थित होते.
सूत्रसंचालक ॠषी देसाई यांनी नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 ला उपस्थित सर्व सहभागी,स्वयंसेवक, नागरिक,लोकप्रतिनिधी व मान्यवर सर्वांचेच आभार मानले.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यातील गायन कलेला मिळालेले रोख रुपये 2,500 चे बक्षिस त्यांनी मालवण सुंदरी स्पर्धेची विजेती ॠतुजा राणे हिला भेट व शुभेच्छा स्वरुपात दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)